VIRAT KOHLI VIRAL VIDEO  Saam tv
Sports

Virat Kohli Welcome In Dominica: तब्बल 12 वर्षानंतर किंग कोहलीचं डॉमिनिकात आगमन; जल्लोषात स्वागत केल्याचा VIDEO होतोय व्हायरल

IND vs WI 1st Test: विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Viral Video: भारत - वेस्ट इंडिज कसोटी मालिका सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये भारतीय संघाचे सराव सत्र पार पडले.

आता पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय खेळाडू डॉमिनिकात दाखल झाले आहे. दरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ डॉमिनिकात पोहोचला असून खेळाडूंच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माजी कर्णधार विराट कोहलीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे.

या व्हिडिओमध्ये विराटचा आनंद अनावर झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया युझर्स या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये भारतीय संघाचा सराव सामना देखील पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडीजचे ८ खेळाडू खेळताना दिसून आले होते. २ दिवसीय सराव सामन्यात भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून आले होते. (Virat Kohli Welcome In Dominica)

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून सुरू होणार आहे. तर २० जुलैपासून दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या क्विंस पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. (Latest sports updates)

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

India Russia Deal 2026: ३००० सैनिक, ५ युद्धनौका अन्...; भारत-रशियामध्ये मोठा लष्करी करार, पाकिस्तानची चिंता वाढली

FASTag पासच्या नावाखाली होतेय फसवणूक, एका चुकीमुळे होईल अकाउंट रिकामं; NHAI ने केलं अलर्ट

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

SCROLL FOR NEXT