Virat Kohli | Rashid Khan Saam TV
Sports

विराट कोहलीचं राशिदला खास गिफ्ट; खान साहेबांनी मानले विशेष आभार

IPL 2022 चा 67 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

Pravin

IPL 2022 चा 67 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खानला बॅट भेट दिली आहे. स्वतः राशीदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. आजचा सामना आरसीबीसाठी खूप खास असणार आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी दोन्ही संघ सरावाच्या वेळी भेटले तेव्हा विराट कोहलीने राशिद खानला ही भेट दिली. या खास क्षणाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत राशिद खानने कोहलीचे आभार मानले आहेत. व्हिडिओ पोस्ट करत राशिद खानने लिहिले की, "विराट कोहलीला भेटून नेहमीच आनंद होतो, गिफ्टबद्दल धन्यवाद."

गुजरात टायटन्सनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी लिहिले, "एका फ्रेममध्ये 450 हून अधिक टी-20 विकेट आणि 10 हजारांहून अधिक धावा"

स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना सराव सामन्यासारखा असणार आहे, तर आरसीबीसाठी तो करा किंवा मरोच्या सामन्यासारखा असणार आहे. आज बंगळुरूचा पराभव झाला तर त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नगण्य आहे.

वानखेडे स्टेडियमवर या वर्षी दोन्ही संघांचे 3-3 सामने झाले असून या मैदानावर कोणत्याही संघाला या दोघांवर मात करता आलेली नाही. अशा स्थितीत आज कोण कोणाला धूळ चारते हे पाहण्यासारखे आहे. या मैदानावरील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला होता आणि तो हाय स्कोअरिंग सामना झाला होता.

Edited By: Praviin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Desingn: 'नो पेंडंट' मंगळसूत्राच्या 5 हटके डिझाईन्स, कोणत्याही साडीवर उठून दिसतील

Viral Video: अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंगमध्ये नाचला शुभमन गिल? व्हायरल व्हिडीओमध्ये चर्चांना उधाण

"नाद" फक्त यामाहा चा! पुण्यातील तरुणांनी मौज मजा आणि नशेसाठी चोरल्या १० दुचाकी

Shocking: MBBS च्या विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या, Sorry म्हणण्यासाठी बॉयफ्रेंडने पनवेलच्या जंगलात आत्म्याला बोलावलं अन्...

Maharashtra Live News Update: जळगवात सोन्याचे दर 3 हजारांनी घसरले, तर चांदीचा भावही घसरला

SCROLL FOR NEXT