virat kohli and gautam gambhir youtube
Sports

Virat Kohli-Gautam Gambhir: माघार घेईल तो किंग कोहली कसला; लखनऊच्या पराभवानंतर विराटने गंभीरला नकळत डिवचलं

Virat Kohli Instagram Story: काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद रंगला होता

Ankush Dhavre

Virat Kohli: आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिल्या सामन्यात पंड्या ब्रदर्स आमने सामने आले होते. कृणाल पंड्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करतोय. तर हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने जोरदार विजय मिळवला. दरम्यान या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या वृद्धिमान साहा आणि भन्नाट झेल टिपणाऱ्या राशिद खानचे विराट कोहलीने कौतुक केल्याचे पाहायला मिळाले आहे.

विराटकडून कौतुकाची थाप..

या सामन्यात वृद्धिमान साहा सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने पहिल्या चेंडूपासूनच लखनऊच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. त्याने या डावात ४३ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची खेळी केली.

या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. त्याची ही खेळी पाहून विराट प्रभावित झाला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर वृद्धिमान साहाचं कौतुक करणारी स्टोरी शेअर केली आहे. त्याने साहाचा फोटो शेअर करत 'काय प्लेअर आहे ..' असे लिहिले आहे.

तसेच या सामन्यात राशिद खानने एक भन्नाट झेल टिपला. त्याचे देखील विराटने स्टोरी शेअर करत कौतुक केले आहे. तर झाले असे की, काईल मेयर्स फलंदाजी करत असताना मोहित शर्माने स्लोवर चेंडू टाकला ज्यावर काईल मेयर्सने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा प्रयत्न फसला. चेंडू हवेत गेला. त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेला राशिद खान धावत आला आणि डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून विराटने कौतुक करत, ' हा मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल आहे.. 'असे लिहिले आहे. (Latest sports updates)

विराटने एक दगडात मारले दोन पक्षी .

काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद रंगला होता. हा वाद होऊन आठवडा उलटला असला तरीदेखील दोघेही एकमेकांना डिवचताना दिसून येत आहे. चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर जेव्हा गंभीर पॅव्हेलियनमध्ये जात होतात्यावेळी विराटचे फॅन्स विराट विराटच्या घोषणा देत असताना, गंभीर रागात पाहताना दिसून आला होता.

आता विराटने स्टोरी शेअर केल्यानंतर अनेकांचं म्हणणं आहे की, विराटने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

विराटने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले. यासह लखनऊ संघ पराभूत झाल्यामुळे विराटला आनंद झाल्याचे देखील दिसून आला आहे. यामागचं कारण असं की, गौतम गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT