Virat Kohli Records twitter/bcci
Sports

IND vs BAN, Virat Kohli Record: किंग कोहलीच्या शतकी खेळीनं मोडला श्रीलंकेच्या दिग्गजाचा रेकॉर्ड! सचिनचा 'महारेकॉर्ड' रडारवर

India vs Bangladesh, World Cup 2023: बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Records:

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीची बॅट जोरदार तळपली. भारतीय संघाला विजय मिळवून देत त्याने ९७ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली. हे विराटच्या वनडे कारकिर्दीतील ४८ वे शतक ठरले आहे.

या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूला मागे सोडलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे सोडलं आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थान आहे. तर श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानी आहे. (Most Runs In International Cricket)

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

किंग कोहलीचा टॉप ४ मध्ये प्रवेश..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकीर्दीत ३४,५३७ धावा केल्या. तर श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकाराने आपल्या कारकीर्दीत २८,०१६ धावा केल्या.

या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटिंगच्या नावे २७,४८३ धावांची नोंद आहे. आता २५,९५८ धावांसह विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. महेला जयवर्धनेने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २५,९५७ धावा केल्या. (Latest sports updates)

सचिनच्या या मोठ्या विक्रमावर नजर..

बांगलादेशविरुद्ध झालेल्या या सामन्यात विराटने वनडे कारकिर्दीतील ४८ वे शतक झळकावले आहे. वनडेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने वनडेत सर्वाधिक ४९ शतके झळकावली आहेत.

विराटला सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी केवळ २ शतकांची आवश्यकता आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाला साखळी फेरीतील ५ सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनलचा सामना असेल.

भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली तर विराटला ७ सामने खेळण्याची संधी मिळेल. या ७ सामन्यांमध्ये जर त्याने २ शतके झळकावली तर सचिनचा वनडेतील मोठा रेकॉर्ड वर्ल्डकप स्पर्धेतच मोडला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT