Virat Kohli Hotel Room Video Leak/Social Media saam tv
Sports

Virat Kohli Video : विराट कोहलीच्या खोलीतील व्हिडिओ लीक; सोशल मीडियावर व्हायरल

विराट कोहली थांबलेल्या हॉटेलमधील खोलीतील व्हिडिओ एका चाहत्याने लीक केला आहे.

Nandkumar Joshi

Virat Kohli News : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. विराट कोहली थांबलेल्या हॉटेलमधील खोलीत एका चाहत्याने घुसखोरी केली आहे. कहर म्हणजे त्याच्या खोलीतील व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकारामुळे विराट कोहली प्रचंड संतापला असून, त्याने हा व्हिडिओ पोस्ट करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वैयक्तिक आयुष्यात अशा प्रकारे डोकावणे चुकीचे असल्याचे विराटने म्हटलं आहे. दरम्यान, अशा प्रकारामुळे खेळाडूंच्या प्रायव्हसीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तो ज्या हॉटेलमध्ये थांबलाय, त्या हॉटेलमधील खोलीत एक चाहता घुसला आणि त्याने खोलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर विराट कोहलीने प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

विराट थांबलेल्या खोलीचा व्हिडिओ व्हायरल

विराटच्या या चाहत्याने हॉटेलमधील खोलीत घुसून तिथला व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला. किंग कोहलीच्या हॉटेलमधील खोलीतील व्हिडिओ अशी कॅप्शन त्याने या पोस्टमध्ये लिहिली. (Latest News)

विराट कोहली संतापला

विराट कोहलीने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित केला आहे. चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहून खूप खूश होतात आणि त्यांना भेटून खूप उत्साहित होतात हे मी समजू शकतो. मात्र, हा व्हिडिओ हादरवणारा आहे. मी अशा प्रकाराने प्रायव्हसीबाबत खूपच चिंतीत आहे. मला हे पटणारे नाही. लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करावा आणि असा प्रकार आपल्या मनोरंजनाचे साधन समजू नये, असं त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

SCROLL FOR NEXT