virat kohli and naveen ul haq saam tv
Sports

Virat Kohli Instagram Story: मैदानात बाचाबाची, आता सोशल मीडियावर जोरदार राडा! विराट अन् नवीनची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल

virat Kohli And Naveen Ul Haq Instagram Story: आता विराट कोहलीने स्टोरी शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

Ankush Dhavre

LSG VS RCB IPL 2023: लखनऊच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने लखनऊ संघावर १८ धावांनी विजय मिळवला. यासह चिन्नास्वामीच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला देखील घेतला आहे.

दरम्यान हा सामना सुरु असताना विराट कोहली विरुद्व नवीन तर सामन्यानंतर विराट विरुध्द गंभीर यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान आता विराट कोहलीने स्टोरी शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

विराटची इंस्टाग्राम स्टोरी

या सामन्यात विराट कोहली आपल्या फलंदाजीमुळे नव्हे तर मैदानात झालेल्या वादामुळे चर्चेत आला. सामना सुरु असताना तो नवीन उल हकला स्लेज करताना दिसून आला होता. त्यानंतर नवीन उल हक देखील प्रत्युत्तर देताना दिसून आला होता. संघातील खेळाडू जेव्हा हात मिळवणी करत होते त्यावेळी दोघेही एकमेकांना काहीतरी बोलताना दिसून आले होते. हा वाद सामना संपल्यानंतर आणखी चिघळला. जेव्हा केएल राहूल दोघांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी विराट कोहली आणि गौतम गंहीर यांच्यात वाद रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

virat kohli inStagram story

या कृत्यानंतर बीसीसीआयने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकवर कारवाई केली आहे. दरम्यान आता विराटने एक स्टोरी शेअर केली आहे.ज्यात त्याने लिहिले की, 'आपण जे काही ऐकतो ते मत असतं, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोनातून असते पण ते सत्य नसते.' विराटची ही स्टोरी पाहून नवीन उल हकने देखील एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, 'ज्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र असता ती गोष्ट तुम्हाला मिळते, हीच जगाची रीत आहे... ' ही पोस्ट देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

naveen ul haq instagram story

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जोरदार विजय..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कर्णधार फाफ डू प्लेसीसने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ३१ धावांचे योगदान दिले.

या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १२६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ संघाला केवळ १०८ धावा करता आल्या . रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT