Ishan Kishan Virat Kohli Saam tv
Sports

Virat Kohli Ishan Kishan Dance: आरारा कडकचं की! विराट- ईशान किशनचा डान्स बघून तुम्हीही असंच म्हणालं; Viral Video बघाच

सध्या सोशल मीडियावर असाच एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट आणि ईशान किशनचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

Ind Vs SL ODI Series: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहली त्याच्या फलंदाजीसाठी तर प्रसिद्ध आहेच, त्याचसोबत विराट त्याच्या मस्तीमुळेही अनेकदा चर्चेत येत असतो. विराट अनेकदा मैदानावर सहकाऱ्यांशी मस्ती करताना दिसत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट आणि ईशान किशनचा धमाकेदार डान्स पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ भारत आणि श्रीलंका सामन्यादरम्यान चा असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकात्तामध्ये पार पडला. ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर चार विकेट्सने विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-० ने अशी विजयी आघाडीही घेतली आहे. या सामन्यानंतर ईशान किशन आणि विराट कोहली यांनी धमाकेदार डान्स केला.

व्हिडिओमध्ये ईशान किशन आणि विराटच्या या जोरदार डान्सवर प्रेक्षकही भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यांच्या या मस्तीच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, गुवाहाटीच्या पहिल्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती. चार वर्षानंतर त्याचं भारतातील हे पहिलं शतक आहे. दुसऱ्या सामन्यात विराट काही खास करु शकला नाही. तो चार रन्सवर बाद झाला. इशान किशनला अजूनपर्यंत दोन्ही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. ईशानने बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या वनडे मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवली होती. (ODI Siries)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT