Desi AB de Villiers VIral Video  Saam TV
Sports

Viral Video: गल्लीतला एबी डिविलियर्स; भन्नाट शॉट पाहून तुम्हीही म्हणाल, दिल मे आता है, समझ में नहीं!

Desi AB de Villiers Video: एका बॅट्समनचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cricket News : भारतात क्रिकेटवर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक गल्लीत एक सचिन, एक विराट, एक धोनी तुम्हाला नक्कीच सापडेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या खेळाडूंचे अनेक चाहते आहेत. टीव्हीवर त्यांचा खेळ पाहणारे खूप जण आहेत. म्हणून त्यांच्या खेळाची अनेकांना माहिती असते. (viral video)

मात्र सोशल मीडियाच्या जगात आता गल्ली क्रिकेटमधील टॅलेंट असलेले अनेक खेळाडू आता हळूहळू समोर येत आहेत. अनेकांनी नावं माहित नसतात, मात्र त्यांची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग पाहून नकळत एखाद्या मोठ्या प्लेयरची पटकन आठवण येते. असाच एका बॅट्समनचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्याचा खेळ पाहून तुम्हालाही दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मिस्टर 360 डिग्री एबी डिविलियर्सची आठवण येईल. (Latest sports updates)

बॉलर कुणीही असो, चेंडू मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात शॉट मारण्याची ताकद एबी डिविलियर्सकडे होती. शॉट विचित्र वाटत असले तरी तो एबीडीच खेळू शकतो. म्हणून आजही एबी डिविलियर्स सारखे शॉट खेळण्याचा अनेक मोठे खेळाडू फक्त प्रयत्न करतात, मात्र एबीडी इतकी सहजता अनेकांना जमत नाही.

व्हायरल व्हिडीओतील गल्ली क्रिकेटमधील खेळाडूची बॅटिंग पाहून तुम्ही त्याची तुलना एबी डिविलियर्सशी कराल. कारण त्याचे शॉट पाहून अनेकांना प्रश्न पडेल, नक्की कसा खेळला? हा खेळाडू इतका चपळ आणि त्याचं टायमिंग इतकं जबरदस्त आहे की समोरच्या टीमचा बॉलरही हतबल झाला असेल. हा बॅट्समन कोण आहे? कुठला आहे? हे कळू शकलेलं नाही, मात्र पठ्ठ्यानं मन नक्कीचं जिंकलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT