Rashid Khan takes first hat-trick of IPL 2023: गुजरात टायटन्सचा लेगस्पिनर राशिद खानने (Rashid Khan) आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आयपीएल 2023 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा रशीद लीगच्या इतिहासातील पहिला आणि 22 वा गोलंदाज ठरला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात राशिदने हॅटट्रिक घेतली. आयपीएलच्या इतिहासातील राशिद खानची ही पहिली हॅट्ट्रिक आहे.
IPL 2023 च्या 13 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचे कर्णधार असलेल्या राशिद खानने 17 व्या षटकातील पहिल्या तीन सलग चेंडूंवर तीन बळी घेत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. या षटकात त्याने आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि मागील सामन्यातील हिरो शार्दुल ठाकूर यांना आपला बळी बनवले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात अखेरच्या षटकात रिंकू सिंगने केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकात्ता नाईट राईडर्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्सनी थरारक विजय मिळवला. तत्पूर्वी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 4 बाद 204 धावांचे लक्ष्य ठेवले. व्यंकटेश अय्यरने अप्रतिम खेळी खेळत 40 चेंडूत 83 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत रशीद खानने हॅटट्रिक घेत गुजरातची सामन्यातवर पकड जमवली. परंतु रिंकू सिंगच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर कोलकाताने या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट राइडर्सला विजयासाठी २०५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्ता नाईट राईटर्सचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. अखेरच्या षटकात रिंकू सिंगने केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर कोलकात्ता नाईट राईडर्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्सनी थरारक विजय मिळवला.
शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती आणि रिंकू सिंग आणि उमेश यादव क्रीजवर उपस्थित होते. उमेशने यश दयालची सिंगल घेतली आणि रिंकूला स्ट्राइक दिली. यानंतर रिंकूने कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने यश दयालविरुद्ध सलग पाच षटकार मारून कोलकाताला तीन विकेट्सने अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.