betting 
Sports

IPL सट्टा बाजारावर छापा; राजस्थनासह नागपूरातील सहा अटकेत

अनिल पाटील

पणजी : वास्को पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजी betting रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. न्यु वाडे येथे टाकलेल्या छाप्यात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री पाेलिसांनी सुशीला सी विन्ड्स नावाच्या एका फ्लॅटवर छापा टाकला असता तेथे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याचे आढळले. vasco-police-busted-racket-ipl-2021-nagpur-rajashtan-goa-crime-news-sml80

या सट्टेबाजीत सहभागी असलेल्या आंतरराज्य सट्टेबाज रॅकेटचा पाेलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच लाेक हे नागपूरचे आणि एक राजस्थान येथील आहे. या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या छाप्यात दाेन लॅपटॉप, मोबाईल, फोन कॉल प्राप्त करण्यासाठी मोबाईल फोनशी जोडलेले दोन सुधारित उपकरण, एक टीव्ही आणि काही लेखी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही टोळी येथे १९ सप्टेंबरपासून कार्यरत होती. त्यांच्याकडून पैसे अथवा वस्तूंचे आधान प्रदान केले जात असे. वास्को येथील एक व्यक्ती या टोळीशी संबंधित आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पाेलिस सूत्रांनी दिला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

Crime News : पोलिस अन् गुन्हेगारांमध्ये चकमक, ४ आरोपींचा एन्काऊंटर; ३ पोलिस गंभीर जखमी

नाश्त्यासाठी झटपट बनवा मक्याचा उपमा; चवदार आणि पौष्टिक

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

SCROLL FOR NEXT