U19W T20 World Cup News  Saam tv
Sports

U19W T20 World Cup : सर्वाधिक धावा करणारी श्वेता 'प्लेअर ऑफ द सीरीज' का झाली नाही? या खेळाडूने मारली बाजी

श्वेताने ७ सामन्यात ९९.०० च्या सरासरी आणि १३९ स्ट्राइक रेटने २९७ धावा कुटल्या. मात्र, या विश्वचषकात इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सने बाजी मारत 'प्लेअर ऑफ द सीरीज'चा किताब मिळवला.

Vishal Gangurde

U19W T20 World Cup : शेफाली शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर-१९ महिला विश्व चषकावर नाव कोरलं. पहिला अंडर-१९ महिला विश्व चषक जिंकून नवा इतिहास रचला. या विश्व चषकात सलामीवीर फलंदाज श्वेता सहरावतने सर्वाधिक धावा कुटल्या. श्वेताने ७ सामन्यात ९९.०० च्या सरासरी आणि १३९ स्ट्राइक रेटने २९७ धावा कुटल्या. मात्र, या विश्वचषकात इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सने बाजी मारत 'प्लेअर ऑफ द सीरीज'चा किताब मिळवला. (Latest Marathi News)

विश्वचषकात स्क्रिव्हन्सने सातत्याने चांगलं प्रदर्शन केलं. ग्रेसने ७ सामन्यात ४१.८५ सरासरी आणि १२९.०७ च्या स्ट्राइक रेटने २९३ धावा कुटल्या. ग्रेसने दुसऱ्या क्रमांकांच स्थान कायम ठेवलं. तर ग्रेसने गोलंदाजी देखील चांगली केली. ग्रेसने ९ गडी बाद केले. ग्रेस सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाचव्या स्थानावर होती.

'प्लेअर ऑफ द सीरीज'चा किताब जिंकल्यानंतर ग्रेस स्क्रिव्हन्स जिंकल्यानंतर आनंदात दिसली. ग्रेस म्हणाली, 'मी खूप आनंदी आहे. मी कधीही परदेशात खेळली नव्हती. माझा हा अनुभव खूप चांगला होता. आम्हाला अनेक वेगवेगळ्या आव्हानातून जावं लागलं. आम्ही खूप सराव केला'.

'आमची फलंदाजी निराशाजनक ठरली. आम्ही विश्वचषकात गोलंदाजांच्या भेदक माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु आमचे प्रयत्न अयशस्वी ठरले. क्रिकेट (Cricket) चाहत्यांकडून पाठिंबा मिळाला. त्यामुळे आनंदी आहे', ग्रेस पुढे म्हणाली.

दरम्यान, अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून (Team India) फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. तितस दास साधूने ४ षटकांत ६ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय अर्चना देवीने २ आणि पार्श्वी चोप्राने २ बळी घेतले.

सोमन यादव, मन्नत कश्यप आणि कर्णधार शफाली वर्मा यांनी १-१ विकेट घेतली. साधूला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

Guava Leaves Benefits for Eye Stye : डोळ्याला रांजणवाडी आली असेल तर पेरूच्या पानांचा सोपा उपाय करा; मिळेल त्वरित आराम

SCROLL FOR NEXT