India vs Pakistan Funny Memes twitter
Sports

India vs Pakistan Memes: 'शेजारऱ्यांचे TV वाचले..', भारत- पाकिस्तान सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

India vs Pakistan Funny Memes: या सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

Ankush Dhavre

Fans Funny Reaction On India vs Pakistan Match:

आशिया चषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात ईशान किशन आणि हार्दिक पंड्याच्या तुफान फटकेबाजी नंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली. तब्बल ४ वर्षानंतर भारत- पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताचा संघ पूर्ण ५० षटकं देखील खेळू शकला नाही.

भारताचा संपूर्ण डाव ४८.५ षटकांत २६६ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाचा टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारतीय संघाचा डाव सावरला.

ईशान किशनने ८२ तर हार्दिक पंड्याने ८७ धावांची खेळी केली. शेवटी जसप्रीत बुमराहने उरलेली कसर पुर्ण करत १६ धावा चोपल्या.

या सामन्याचा पहिला डाव पूर्ण झाला मात्र दुसरा डाव पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही.त्यामुळे काही क्रिकेट चाहते निराश झाले.

तर काहींना पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरल्याचा आनंद झाला आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठानने एक मजेशीर ट्विट केलं आहे. जे सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

पाकिस्तानचा सुपर ४ मध्ये प्रवेश..

हा सामना रद्द झाला असला तरीदेखील पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना नेपाळ संघाविरूद्ध पार पडला होता. या सामन्यात पाकिस्तानने दमदार खेळ करत २३८ धावांनी विजय मिळवला होता.

यासह पाकिस्तानने २ गुणांची कमाई केली होती. आता भारत- पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला आहे. त्यामुळे ३ गुणांसह पाकिस्तानने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT