shubman gill saam tv news
Sports

Shubman Gill Memes: गुजरातमध्ये गिल शून्यावर बाद! सुपरफ्लॉप कामगिरीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Shubman Gill Funny Memes: गेल्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल या सामन्यात शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. अवघ्या ९ चेंडूंचा सामना करत त्याने पॅव्हेलियनची वाट धरली आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Latest News:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील तिसऱ्या कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. या सामन्यात अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत सरफराज खान, रजत पाटीदार आणि ध्रुव जुरेलसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे. तर दुसरीकडे गेल्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल या सामन्यात शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. अवघ्या ९ चेंडूंचा सामना करत त्याने पॅव्हेलियनची वाट धरली आहे.

शुभमन गिल वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सुपरहिट ठरत आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये धावा करताना तो संघर्ष करताना दिसतोय. सुरुवातीच्या २ सामन्यातील ३ डावात तो स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर चौथ्या डावात त्याने शतक झळकावलं. इथून वाटलं होतं की, शुभमन गिल फॉर्ममध्ये परतला आहे. मात्र राजकोट कसोटीत पुन्हा एकदा जैसे थे चित्र पाहायला मिळाले आहे. ९ चेंडू खेळून तो शून्यावर माघारी परतला. या फ्लॉप कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. (Cricket news in marathi)

भन्नाट मीम्स व्हायरल..

इंग्लंडविरुद्ध शुभमन गिल फ्लॉप..

इंग्लंडविरुद्ध खेळताना शुभमन गिलचा रेकॉर्ड समाधानकारक राहिलेला नाही. तो आपल्या कारकिर्दीत ४ वेळेस खातं ही न उघडता माघारी परतला आहे. त्याचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड पाहिला तर त्याला ८ सामन्यातील १४ इनिंगमध्ये केवळ ३०१ धावा करता आल्या आहेत.

तसेच त्याचा या मालिकेतील रेकॉर्ड पाहिला तर त्याने गेल्या सामन्यातील दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलं होतं. ३ सामन्यातील ५ डावात त्याला ३२ च्या सरासरीने १६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो २ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT