suyash jadhav 
Sports

भारतीय क्रीडाप्रेमींना बसला धक्का; जलतरणपटू सुयश जाधव ठरला अपात्र

Siddharth Latkar

टाेकियाे : येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत जलतरण क्रीडा प्रकारात भारताचा अव्वल जलरणपटू सुयश जाधव suyash jadhav हा पुरुषांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (एसबी ७) मधील अंतिम फेरीत अपात्र ठरला आहे. यामुळे देशासह महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींत नाराजी पसरली आहे.

सुयश हा साेलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आहे. ताे एक उत्तम जलतरणपटू आहे. राज्य शासनाने त्याच्या कामगिरीच्या जाेरावर त्याचा राज्याचा सर्वश्रेष्ठ मानला जाणा-या श्री शिवछत्रपती पुरस्काराने गाैरव केला आहे.

आज झालेल्या स्पर्धेत सुयशने परतीच्या मार्गावर एक जादा पाय मारला असे अधिकृत नाेंदीनुसार सांगितले गेले. त्यामुळे त्याची स्पर्धेतील वेळची नाेंद झालेली नाही. तसेच तांत्रिक दृष्टया ताे स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आला.

टाेकियाे पॅरालिंपिक स्पर्धे दरम्यान ताे आजारी असल्याचे सांगितलं जात आहे. आजच्या जलतरण क्रीडा प्रकारात ताे अपात्र ठरला आहे. त्याबाबत सरकारच्या दूरदर्शन स्पाेर्टसने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

दरम्यान आजच्या जलतरण स्पर्धेत कोलंबियाच्या कार्लोस जरेटने १ मिनीट १२ सेंकद ०१ अशी वेळ नाेंदवित सुवर्णपदक तर रशियन पॅरालिम्पिक समितीच्या (आरओसी) एगोर एफ्रोसिनिनने रौप्यपदक पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक कोक्रेनने अंतिम फेरीत कास्यपदक पटकावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT