Virat Kohli tweets saam tv
Sports

Virat Kohli: विराटकडून एक-एक शब्दाचे ३ ट्विट्स; चाहत्यांना कोडं काही सुटेना? कोहलीचा नेमका कोणावर निशाणा?

Virat Kohli: सकाळी विराटने सलग ३ ट्विट केले आहे. दरम्यान विराट कोहलीने असं का केलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला असून चाहते या कोड्यामध्ये अडकलेत.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली चांगलाच चर्चेत असतो. बरेचदा विराट सोशल मीडियावर कमर्शियल पोस्ट करत असतो. मात्र आज सकाळी विराटने सलग ३ ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये विराटने केवळ एकच शब्द लिहिला आहे. विराट कोहलीच्या या सोशल मिडिया पोस्टमुळे चाहते मात्र पुरते गोंधळले आहेत.

उद्यापासून बांगलादेश विरूद्ध भारत यांच्यामध्ये २ सामन्यांच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला टेस्ट सामना चेन्नईमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी विराट कोहलीने केलेल्या सोशल मिडिया पोस्टमुळे चाहते हैराण झाले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, हे सोडवण्यात चाहते लागले आहेत.

विराट कोहलीने सोशल मीडियावर काय पोस्ट केलंय?

विराटने हे तीन ट्विट कोणत्या मुद्द्यावरून आणि का केले हे चाहत्यांना समजू शकलेलं नाही. काही चाहत्यांनी विराटने सकाळीच असे ट्विट केल्याने सगळं काही ओके आहे ना, असा सवाल केला आहे. विराट कोहलीने एका पाठोपाठ एका ट्विटमध्ये Kindness (दयाळूपणा), Chivalry, Respect (सन्मान) असं शब्द लिहिले आहेत. दरम्यान या शब्दांव्यतिरीक्त विराटने अजून काहीही पोस्ट केलेलं नाही. त्यामुळे यामागे नेमकं काय आहे, याचा अर्थ लावण्यात चाहते व्यस्त आहेत.

कसा आहे विराटचा टेस्ट रेकॉर्ड?

विराट कोहलीने भारतासाठी आतापर्यंत 113 टेस्ट सामने खेळले आहे. यावेळी विराटने 49.15 च्या सरासरीने 8848 रन्स केलेत. विराट कोहलीच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 29 शतकांची नोंद आहे. तर उद्यापासून बांगलादेशाविरूद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यात विराट कोहली मैदानात उतणार आहे.

विराट-गंभीरच्या मुलाखतीचा व्हिडीओ

नुकतंच बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरची मुलाखत घेतोय. विराट आणि गंभीर या दोन्ही दिल्लीच्या खेळाडूंमध्ये वाद असल्याचं सर्वांना माहितीये. दरम्यान या मुलाखतीत दोघांनीही वादाबाबत भाष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रांका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT