GUJARAT TITANS Yandex
Sports

IPL 2025: या अन्कॅप्ड खेळाडूची लागणार लॉटरी! मेगा ऑक्शनमध्ये लागू शकते मोठी बोली

IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील मेगा ऑक्शनमध्ये या स्टार भारतीय खेळाडूवर मोठी बोली लागू शकते.

Ankush Dhavre

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, प्रत्येक संघ ५ खेळाडूंना रिटेन करू शकतो. तर एका खेळाडूला RTM कार्डचा वापर करून आपल्या संघात पुन्हा घेऊ शकतो. आतापर्यंत कुठल्याही संघाने आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. दरम्यान एक खेळाडू असा आहे, जो लिलावात येताच फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पैशांचा पाऊस पाडतील.

या अन्कॅप्ड खेळाडूवर लागू शकते सर्वात मोठी बोली

आयपीएल स्पर्धेसाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंवर मोठी बोली लागणार यात काही शंकाच नाही. मात्र भारताचा एक असा खेळाडू आहे, ज्याच्यावर मोठी बोली लागू शकते. हा खेळाडू आहे,अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया. गेल्या काही वर्षांपासून त्याने आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यासह गेल्या काही वर्षांत त्याने फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तेवतियाची ही कामगिरी पाहता, आगामी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. तेवतियाने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ४ संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यात राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या ४ संघाचा समावेश आहे.

तेवतियाने आतापर्यंत ९३ सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १०१३ धावा केल्या आहेत. तेवतिया आपल्या फिनिशिंगसाठी प्रसिद्ध आहे. आता कोणता संघ त्याच्यावर मोठी बोली लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी... लाडकीच्या खात्यात खटाखट ₹४५०० येणार? पण या महिलांचा लाभ कायमचा बंद

Box Office Collection: 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; शाहरुख खानच्या 'या' चित्रपटाचा केला रेकॉर्ड ब्रेक

Green Bangles Designs: हिरव्या काचेच्या बांगड्यांच्या या आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स, नवरीचा लूक दिसेल सर्वात उठून

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Marathi Serial: तेजश्री प्रधान आणि रेश्मा शिंदेच्या मालिकेत रंगली स्पर्धा; कोणती मालिका ठरली प्रेक्षकांची फेव्हरेट? पाहा TRP यादी

SCROLL FOR NEXT