BJP च्या या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार Saam Tv
Sports

BJP च्या या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार

आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नाही तर भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसामध्ये तक्रार दिल्यावर आरोपी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलेने लावलेल्या आरोप खरे असल्याची प्राथमिक माहिती ही तपासात स्पष्ट झाली आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनकडून देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. संबंधित घटना झारखंड राज्यातील पश्चिमी सिंहभूम या ठिकाणची आहे. तर संजय मिश्रा Sanjay Mishra असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहेत.

हे देखील पहा-

याविषयी माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यावर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितले की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोपात देखील सत्य बाहेर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मिश्रा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत असत. आरोपी संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा एक फोटो काढला होता. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण करत होता. दुसरीकडे, अटक होण्याअगोदर संजय मिश्रा यांनी एक व्हिडीओ केला आहे.

यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, माझे विरोधक मला निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पराभूत करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी एकजुटीने माझ्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात आल आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणे हे विरोधकांनी रचलेलं या घृणास्पद षडयंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्सचे तपास करावे. तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या हॉटेलमधील 3 एप्रिलचे रजिस्टर तपासावे आणि सीसीटीव्ही देखील पाहावेत. असे त्यांनी यामध्ये म्हंटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT