IPL 2025 twitter
Sports

IPL 2025 Mega Auction: 'या' भारतीय खेळाडूंना लिलावात भारी डिमांड, कोट्यवधी रुपयांची आहे Base Price

इंडियन प्रीमियर लीग (IPL)2025 साठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. सौदी अरेबिया येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हा लिलाव होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंडियन प्रीमियर लीग (IPL)2025 च्या खेळाडूंचा मेगा लिलावाची तारीख जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या स्पर्धेसाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. सौदी अरेबिया येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी हा लिलाव होणार आहे.

10 आयपीएल फ्रँचायझींमध्ये एकूण 204 स्लॉट उपलब्ध आहेत. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 25 खेळाडूंच्या संघाला परवानगी आहे. नोंदणी यादीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व आहे आणि 1165 खेळाडूंनी साइन अप केले आहे, तर 409 परदेशी खेळाडू देखील प्रतिष्ठित आयपीएल करराची अपेक्षा करतील.

1. 320 खेळाडूंनी त्यांच्या राष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व केले आहे, 48 भारतीय आणि 272 आंतरराष्ट्रीय आहेत.

2. 1224 खेळाडू अनकॅप्ड आहेत, 965 भारतीय आणि 104 आंतरराष्ट्रीय आहेत.

3. 152 अनकॅप्ड भारतीय मागील आयपीएल हंगामाचा भार होते.

4. 3 अनकॅप्ड आतंरराष्ट्रीय सामने मागील आयपीएलचा भाग हेत.

5. 30 खेळाडू असोसिएट नेशन्सचे आहेत.

ऑस्ट्रेलियाचे परदेशात सर्वाधिक 76 खेळाडू आहेत. त्यानंतर दक्षिण आफिक्रा 91 आणि इंग्लंड 52 आहेत. ऑक्शनमध्ये न्यूझीलंड , वेस्ट इंडिड, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, कॅनडा, नेदरलँड्स, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, यूएई, यूएसए आणि इटलीचे खेळाडूदेखील आहेत. संघ त्यांच्या मूळ किमतीवर बोली लावू शकतात किंवा ऑफर वाढवू शकतात. ज्या संघांनी त्यांना आयपीएल 2024 मध्ये नियुक्त केले होते त्यांच्याकडे त्यांच्यासंबंधित राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरुन त्यांना कायम ठेवण्याची लक्झरी आहे.

मूळ किंमत असलेल्या भारतीय खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे:

ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, आर अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, ईशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसिध्द कृष्णा, टी. नटराजन, देवदत्त पडिक्कल, कृणाल पंड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT