पदार्पणात दुहेरी शतक ठोकणार्‍या खेळाडूला आयसीसी पुरस्कारने केले सन्मानित Saam Tv
Sports

पदार्पणात दुहेरी शतक ठोकणार्‍या खेळाडूला ICC पुरस्कारने केले सन्मानित

कसोटी मालिकेसह सलामीवीर डेव्हन कॉनवेने किवी संघाकडून पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते.

वृत्तसंस्था

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 (WTC Finals 2021) च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारताविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेसह सलामीवीर डेव्हन कॉनवेने किवी संघाकडून पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावले होते. कॅानवेने काही खेळी जूनमध्ये ही केली होती. त्यामुळेच कॅानवेला जून महिन्याच्या आयसीसी 'प्लेयर ऑफ दि मंथने सन्मानित' करण्यात आले आहे.

डेव्हन कॉनवे व्यतिरिक्त इंग्लंड संघाची फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनला महिला गटातून जून महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्काराने गैरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक निवेदन जारी केले आहे की, “कॉनवेने भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवडल्या गेलेला सहकारी काइल जेमीसन व दक्षिण आप्रिकेच्या क्विंटन डी कॉक यांना मागे सोडत प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कार जिंकला आहे''.

कॉनवेने कसोटी क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी बजावली होती आणि लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते. हा पुरस्कार मिळल्यानंतर कॉनवे म्हणाले, "मला हा पुरस्कार मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. कसोटी क्रिकेटमधील माझ्या कामगिरीच्या आधारे मला हा पुरस्कार मिळाला आहे, जो माझ्यासाठी विशेष आहे".

दुसरीकडे महिला खेळाडूंमध्ये सोफी इक्लेस्टोनने भारताच्या शेफाली वर्मा आणि स्नेह राणाला मागे पाडत हा पुरस्कार जिंकला आहे. यासह, सोफी आयसीसीचा महिला प्लेअर ऑफ दि मंथ जिंकणारी इंग्लंडचा टॅमी ब्यूमॉन्टनंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. 2018 मध्ये आयसीसीचा इमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकणारी सोफी इक्लेस्टोन ही ब्रिस्टल येथे झालेल्या भारत विरुद्ध कसोटी सामन्यात आठ विकेट्स घेणारी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT