IND VS ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी  टीम इंडियाची घोषणा; शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी, मराठमोळ्या खेळाडूची संघात एंट्री
Team India Zimbabwe T20 Series  Mint
क्रीडा | T20 WC

IND VS ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी, मराठमोळ्या खेळाडूची संघात एंट्री

Bharat Jadhav

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. पुढील महिन्यातील म्हणजे ६ जुलैपासून दोन्ही संघांचे सामने सुरू होणार आहेत. या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आलीय. शुभमन गिलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर विराट कोहली-रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. या टीम इंडियात मराठमोळ्या खेळाडूसह रायन परागसह ५ खेळाडूंची पहिल्यांदाच टी-२० संघात निवड झालीय.

पुढील महिन्यातील म्हणजे ६ जुलैपासून दोन्ही संघांचे सामने सुरू होणार आहेत. या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आलीय. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच या मालिकेत पाच खेळाडूंना संधी देण्यात आलीय. पहिल्यांदाच टी-२० संघात सामील झाले आहेत. निवडकर्त्यांनी अभिषेक शर्मा, रियान पराग, नितीश रेड्डी, तुषार देशपांडे आणि ध्रुव जुरेल यांना संघात संधी मिळाली आहे.

दरम्यान, झिम्बाब्वे मालिकेमुळे चार खेळाडूंचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. ऋतुराज गायकवाडला पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. लेगस्पिनर रवी बिश्नोई, वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि आवेश खान यांचेही पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे आयपीएल विजेत्या KKR संघात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाहीये. श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय व्यंकटेश अय्यर, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांना संघात स्थान मिळालेले नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : सासवडमधून होणार सोपान काकाच्या पालखीचे प्रस्थान

Ajit Pawar Group News : विधानसभेत अजित पवार गट 85 जागा लढवणार?

Job Opportunities: 12 वी उत्तीर्ण जी एन एम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची मोठी संधी

Stock Market : शेअर बाजार उघडताच नवा विक्रम; सेन्सेक्स पहिल्यांदा ८० हजार पार, निफ्टीनेही गाठला ऐतिहासिक उच्चांक

Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT