kl rahul virat kohli saam tv
Sports

Team India News: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! विराट- राहुलचा ही मोठी स्पर्धा खेळण्यास नकार, कारण..

Virat Kohli- KL Rahul Refused To Play Ranji Trophy: भारतीय संघातील स्टार खेळाडू विराट कोहली आणि केएल राहुलबद्दल मोठी अपडेट आली आहे.

Ankush Dhavre

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध सुपरफ्लॉप कामगिरी केल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने १० पॉईंट्स पॉलिसी लागू केली होती. या पॉलिसीनुसार, सर्व खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचं असेल, तर देशांर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे.

त्यामुळे विराट कोहली दिल्लीच्या रणजी संघातून खेळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. दिल्लीचा पुढील सामना २३ जानेवारीला रंगणार आहे. मात्र माध्यमातील वृत्तानुसार,विराटने रणजी ट्रॉफी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इएसपीएन क्रिकेइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला स्पष्ट सांगितलंय. त्याच्या मानेला झाली दुखापत पूर्णपणे ठिक झालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सिडनी कसोटीदरम्यान त्याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसून येणार नाहीये. दिल्लीचा पुढील सामना २३ जानेवारीला सौराष्ट्रविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रिषभ पंत खेळताना दिसून येणार आहे.

केएल राहुलही बाहेर

भारतीय संघासाठी आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे. इएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, विराटसह केएल राहुल देखील दुखापतग्रस्त आहे. राहुल कोपराच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे तो पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. हे दोघेही पुढील सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीत. मात्र त्यानंतर होणाऱ्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात दोघेही खेळताना दिसून येऊ शकतात.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार, सर्वांना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिर्वार्य असणार आहे. मात्र जे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार देतील, अशा खेळाडूंवर बीसीसीआयकडून कारवाई केली जाईल. एखाद्या खेळाडूला जर काही कारणास्तव खेळता येणार नसेल, तर त्याला हेड कोच आणि निवडकर्त्यांची अनुमती घ्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

SCROLL FOR NEXT