IND VS AUS 1st Test  Saam Tv
Sports

IND VS AUS 1st Test :तिसऱ्या दिवशीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी! पहिल्या डावात घेतली इतक्या धावांची आघाडी

या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

Saam TV News

IND VS AUS 1st Test :सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

भारतीय संघाने सुरुवातीला गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव अवघ्या १७७ धावांवर संपवला. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला येत भारतीय फलंदाजांनी देखील जोरदार आक्रमण केले आहे.

भारतीय संघाचा पहिला डाव ४०० धावांवर संपुष्टात आला आहे. भारतीय संघाने या डावात २२३ धावांची आघाडी घेतली आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाचा डाव अवघ्या १७७ धावांवर संपुष्ठात आला होता. ज्यामध्ये रवींद्र जडेजाने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते.

तर फलंदाजी करताना देखील त्याने तुफानी खेळी करत ७० धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने ८४ धावांची खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ४०० पर्यंत पोहचवली. (Latest Sports Updates)

ऑस्टेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघय १७७ धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, मार्नस लाबुशेनने एकाकी झुंज देत ४९ धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला. तर स्टीव्ह स्मिथने ३७ आणि ॲलेक्स कॅरीने ३१ धावांचे योगदान दिले होते.

भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी...

प्रत्युत्तरात भारतीय संघातील फलंदाजानी दमदार फलंदाजी केली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने १२० धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव यांना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची धावसंख्या ७ गडी बाद २४० धावा इतकी होती. त्यानंतर अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत, भारतीय संघाची धावसंख्या ४०० पर्यंत पोहचवली.

या डावात अक्षर पटेलने ८४ तर रवींद्र जडेजाने ७० आणि मोहम्मद शमीने ३७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. २२३ धावांच्या आघाडीसह भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT