India Vs west Indies T 20 series Sanju Samson added Team India Squad / BCCI Tweet SAAM TV
Sports

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, उद्यापासून टी-20 मालिकेला सुरुवात; पाहा T- 20 आणि वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर टीम इंडिया साऊथ आफ्रीका दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आता टी- 20 वर्ल्ड कप आधी साऊथ आफ्रीकेशी भिडणार आहे. टी-20 आणि वनडे सामन्यांची मालिका येत्या उद्यापासून सुरु होणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 28 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर पुढील महिन्यात तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघही जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ब्रेक देण्यात आला आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत दीपक चहरला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते. टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करू शकतो.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिकेची सुरुवात उद्यापासून होत आहे. उद्या पहिला सामना त्रिवेंद्रम येथे खेळवला जाणार आहे. त्यांतर 1 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना गुवाहाटी येथे तर तिसरा सामना 3 ऑक्टोबर रोजी इंदूर येथे खेळवला जाईल.

एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. वनडे मालिकेचा पहिला सामना रांची येथे खेळवला जाईल. तर दुसरी वनडे 9 ऑक्टोबर रोजी लखनौ येथ तर तिसरी वनडे 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे खेळवली जाईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग , मोहम्मद शमी, दीपक चहर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT