team india  twitter
Sports

IND vs PAK, Playing XI: पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार; या खेळाडूचं होणार कमबॅक

India vs Pakistan, Playing XI Prediction: येत्या ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडला नमवत विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आयर्लंडलचा डाव ९६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १२.२ षटकात ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान क्रिकेट चाहते भारत- पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ९ जून रोजी आमने सामने येणार आहेत. हा सामना देखील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला होता. या सामन्यात रोहित- विराट सलामीला आले होते. तर यशस्वी जयस्वालला विश्रांती दिली गेली होती. दरम्यान पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो भारतीय संघाकडून खेळताना दिसून् येऊ शकतो.

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.

पाकिस्तान संघाची प्लेइंग ११

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह अफरीदी, मोहम्मद आमिर, हारिस रऊफ आणि नसीम शाह.

पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १२ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १२ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर पाकिस्तानला केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात ओबीसी विद्यार्थी फेलोशिपच्या मुद्द्यावरून आक्रमक

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Gossip: गॉसिप करणं फायद्याचं की तोट्याचं? रीसर्चमधील निष्कर्ष एकदा वाचाच!

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

SCROLL FOR NEXT