team india twitter
Sports

Team india Playing XI: डे - नाईट कसोटीत टीम इंडिया या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

Ind vs aus 2nd Test, Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये दमदार सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना ॲडीलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना डे नाईट सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळताना दिसून आला नव्हता. मात्र दुसऱ्या कसोटीत तो कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्यामुळे तो प्लेइंग ११ मध्ये खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे. यासह शुभमन गिल दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तो देखील या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्याचा देखील प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाईल.

हर्षित राणा खेळणार..

सराव सामन्यात हर्षित राणाने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे हर्षित राणाला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार हे निश्चित आहे. सराव सामन्यातील ६ षटकात ४४ धावा खर्च करत त्याने ४ गडी बाद केले.

या खेळाडूंना विश्रांती मिळणार?

रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या कमबॅकनंतर २ खेळाडू संघाबाहेर जाणं फिक्स आहे. ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडीक्कलला विश्रांती दिली जाऊ शकते.

दुसऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केएल राहुल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT