team india saam tv
Sports

Team India Playing 11: आता विंडीजचं काही खरं नाही! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात धाकड खेळाडूची एंट्री; पाहा प्लेइंग 11

IND vs WI 2nd Test: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 2nd Test Team India Playing 11 Prediction: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसरा सामना २० जुलैपासून त्रिनिदादमधील क्वीन्स पार्कच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारताचा संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर वेस्टइंडीजचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असेल.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशनला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. या संधीचा फायदा घेत यशस्वी जयस्वालने ताबडतोड फलंदाजी करत १७१ धावांची खेळी केली होती. (Team India Playing 11 Prediction)

तर दुसरीकडे ईशान किशन फ्लॉप ठरला होता. त्याला २० चेंडूत केवळ १ धाव करता आली होती. हा सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात बदल करण्याचे संकेत दिले होते. आता कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुकेश कुमार करणार पदार्पण?

पहिल्या कसोटीत भारताचा संघ मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट या ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. आता संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुकेश कुमारला संघात स्थान दिले जाऊ शकते. मुकेश कुमारला (Mukesh Kumar) जयदेव उनाडकटच्या जागी संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ :

यशस्वी जयस्वाल,रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, अंजिक्य रहाणे, ईशान किशन, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट/ मुकेश कुमार.

दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते वेस्टइंडीज संघाची प्लेइंग ११ :

क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, जरमेन ब्लॅकवूड, एलिक एथानजे, रेमेन रिफर, जोशुआ डि सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, केविन सेंकलेयर, शनन गॅब्रियल, रहकिम कॉर्नवॉल, अल्जारी जोसेफ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT