team india saam tv
Sports

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी

Team India Squad For ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी ८ पैकी ६ संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. मात्र भारतीय संघाने अजूनही आपल्या संघाची घोषणा केलेली नाही.

आज या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात १५ खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळली जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने युएई खेळली जाणार आहे. दरम्यान कोणत्या १५ खेळाडूंना संधी मिळणार? जाणून घ्या.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्मासह, विराट कोहली आणि केएल राहुल यांना संधी मिळणं जवळजवळ निश्चित आहे. यासह दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहला देखील संधी देण्यात येऊ शकते. मात्र तो खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत करुण नायरने धावांचा पाऊस पाडला आहे, त्याला संघात संधी देण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याला संघात संधी मिळणं कठीण आहे. यासह संजू सॅमसनला देखील संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

या अष्टपैलू खेळाडूंना मिळणार संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या यांना संधी दिली जाऊ शकते. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

यावरून अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, शमीचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. मात्र हा संघ फायनल संघ नसेल. बीसीसीआयकडे १३ फेब्रुवारीपर्यंत या संघात बदल करण्याची संधी असणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा असू शकतो भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Impact Player नको, एका गोलंदाजाला 5 ओव्हर, सचिन तेंडुलकरने IPL मध्ये सुचवले 3 मोठे बदल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू; भरधाव दुचाकी महामार्गावर उभ्या कंटेनरमध्ये घुसली, वाहनांचा चक्काचूर

पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

Maharashtra News Live Update: शिर्डी नाशिक महामार्गावर भीषण अपघात..

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT