team india  twitter
Sports

IND vs ENG 3rd Test: टीम इंडिया अजूनही करु शकते कमबॅक! तिसऱ्या दिवशी कराव्या लागतील या ३ गोष्टी

Team India Comeback Scenario IND vs ENG 3rd Test: राजकोट कसोटीत ४४५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर असं वाटत होतं की, भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत आहे.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, Team India Comeback Scenario:

राजकोट कसोटीत ४४५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर असं वाटत होतं की, भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत आहे. मात्र इंग्लंडने बॅझबॉल मोड ऑन करत भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला २ मोठे धक्के बसले. मात्र बेन डकेटने एक बाजू धरून ठेवली आणि १३३ धावांवर नाबाद माघारी परतला.(IND vs ENG)

पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत इंग्लंडने २ गडी बाद २०७ धावा कुटल्या आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही इंग्लंडच्या फलंदाजांनी अशीच फलंदाजी केली तर भारतीय संघाचं कमबॅक करणं कठीण होईल. त्यामुळे भारतीय संघाला कमबॅक करण्यासाठी या ३ गोष्टी कराव्या लागतील.

बेन डकेटला बाद करणं गरजेचं..

सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच आर अश्विन वैयक्तिक कारणास्तव कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजावर असणार आहे. बेन डकेट १३३ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी मिळून जर बेन डकेटला लवकरात लवकर बाद केलं, तर इंग्लंडचा संघ बॅकफूटवर जाऊ शकतो. (Cricket news in marathi)

धावांचा बचाव करणं गरजेचं..

राजकोट कसोटीतील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी उपहार स्वरुपात इंग्लंडला ११ अतिरिक्त धावा दिल्या आहेत. यादरम्यान १ धाव बाय स्वरुपात, १ धाव लेग बाय, ४ धावा नो स्वरुपात आणि ५ धावा पेनल्टी स्वरुपात खर्च केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना ही चूक टाळावी लागणार आहे. अन्यथा इंग्लंडचे फलंदाज मोठी धावसंख्या करु शकतात.

बुमराहवर असेल संघाची मदार..

गेल्या कसोटीत बुमराहने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले होते. आता या कसोटीतही बुमराहला अशीच काहीशी कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे. चेंडू जुना झाल्यानंतर रिव्हर्स स्विंग मिळेल. तेव्हा बुमराह इंग्लंडच्या फलंदाजांसाठी घातक ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT