T20 World Cup saam tv
Sports

T20 World Cup: आज २ टीम्सना मिळणार वर्ल्डकपमध्ये सुपर ८ चं तिकीट; पाहा ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचं काय होणार?

T20 World Cup 2026 Super 8 Teams: टी२० वर्ल्डकपमध्ये सुपर ८ साठीची शर्यत रंगलीये. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असून आजचे सामने पात्रतेचं गणित बदलू शकणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

२० टीम्ससोबत यंदाच्या टी-२० वर्ल्डकपची सुरुवात करण्यात आली होती. या २० टीम्सना पाच-पात अशाच ग्रुप्समध्ये विभागण्यात आलं होतं. आता ग्रुप स्टेजमधील स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. यावेळी पाच देशांनी सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर आज दोन टीम्स सुपर ८ मध्ये स्थान मिळवू शकणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर भारताकडून झालेल्या पराभव झाल्यानंतर पाकिस्तान पुढील फेरीत गाठू शकलेला नाही.

पाकिस्तानही होऊ शकते बाहेर

ग्रुप ए मधून फक्त टीम इंडिया सुपर ८ साठी पात्र ठरलीये. पॉइंट टेबलमध्ये अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र अमेरिकेचे चारही सामने खेळून झालेत. तर पाकिस्तानचेही चार गुण आहेत परंतु नेट रन रेटच्या आधारे ते अमेरिकेपेक्षा मागे आहे. दरम्यान पाकिस्तान विरुद्ध नामिबिया सामना बुधवारी रंगणार आहे. जर पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आणि नामिबिया जिंकली तर २०२४ प्रमाणे अमेरिका सुपर ८ मध्ये पोहोचेल.

ग्रुप बीमधून श्रीलंका पोहोचली सुपर ८ मध्ये

बी ग्रुपमधून श्रीलंकेने ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. सोमवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेना ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम जवळपास वर्ल्डकपमधून बाहेर पडलीये. आज दुपारी ३ वाजता झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना रंगणार आहे. जर झिम्बाब्वे जिंकली तर त्यांचे ६ गुण होतील.

ग्रुप सीच्या दोन्ही टीम्स कन्फर्म

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. सलग तीन सामने जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज सहा गुणांसह टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडने त्यांचे चारही सामने खेळले आहेत आणि त्यांचे सहा गुण आहेत. या गटातील इतर कोणतीही टीम आथा ६ पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकत नाही.

ग्रुप डीचं कसं आहे समीकरण

ग्रुप डीमधील दक्षिण आफ्रिकेची टीम सुपर ८ मध्ये पोहोचणार आहे. दुसऱ्या स्थानासाठीचा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात आहे. न्यूझीलंडने त्यांचे तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने तीनपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. त्याचे दोन पॉईंट्स आहेत परंतु शेवटचा सामना जिंकून ते चार पॉईंट्सपर्यंच पोहोचू शकतात.

आज या २ टीम्स करू शकतात क्वालिफाय

आज कॅनडाला हरवून न्यूझीलंड २०२६ च्या टी२० वर्ल्डकपमधील सुपर ८ मध्ये पोहोचणारी सहावी टीम असेल. तर दुसरा सामना झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड असा आहे. झिम्बाब्वे जिंकली तर ती सुपर ८ मध्ये पोहोचू शकते. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया ग्रुप स्टेजमधून बाहेर पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेत मोठा राडा, कायदे मंत्री शपथ घेताना खासदारांची हाणामारी; तुर्कस्तानमध्ये घडला प्रकार, VIDEO

Viral Video: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! समोरून येणाऱ्या ट्रकची भरधाव गाडीला टक्कर, थरारक दृश्य cctv मध्ये कैद

Railway Station : मुंबई, पुणे नव्हे तर 'हे' आहे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, पाय दुखतील पण प्लॅटफॉर्म संपणार नाही

Sunetra Pawar : त्या ३५ आमदारांचाच सुनेत्रा पवारांना पाठिंबा, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून रोहित पवारांना नेमकं काय म्हणायचंय?

Maharashtra Live News Update: ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येईल - सुरेश धस

SCROLL FOR NEXT