#SpiritofCricket: पाकिस्तानी खेळाडू नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये; पाहा Video  Saam TV
Sports

#SpiritofCricket: पाकिस्तानी खेळाडू नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये; पाहा Video

पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नामिबियावर विजय मिळवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

वृत्तसंस्था

पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नामिबियावर विजय मिळवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात या संघाने नामिबियाचा 45 धावांनी पराभव केला आहे. नामिबियाच्या संघासाठी हा पहिलाच विश्वचषक होता आणि सुरुवाती पासूनच चांगला खेळ करत त्याने प्रथम सुपर 12 मध्ये स्थान मिळवले आणि नंतर आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. विजयानंतर पाकिस्तानी खेळाडू शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हाफीज, प्रशिक्षक, फखर जमान, शादाब खान आदींनी नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचून संघाचे चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

पाकिस्तानच्या अधिकृत सोशल साइटवर नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलेल्या पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानी प्रशिक्षक सकलेन मुश्ताक, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, फखर जमान यांच्यासह अनेक खेळाडू नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले आणि संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. यादरम्यान नामिबियाचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडू शाहीन शाह आफ्रिदीसोबत फोटो काढताना दिसले.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा T20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 च्या दुसऱ्या गटात समावेश आहे. या गटात भारतासह नामिबिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान संघाचा समावेश आहे. पाकिस्तान संघ गट 2 मधील पहिला संघ आहे, ज्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता आणखी एक संघ शिल्लक आहे, ज्यासाठी न्यूझीलंड प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाला आपले स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंडच्या पराभवासह स्वतःच्या विजयाची गरज आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याण जवळील गांधारी नदीत तरुण बुडाला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, मनसे नेत्याच्या फॉर्च्युनरचा चक्काचूर

Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

SCROLL FOR NEXT