Cricket Latest News Saam Tv
Sports

ICC T-20 Ranking : सूर्यकुमार यादव नंबर-१ च्या जवळ, टॉप-१० मध्ये भारताचा एकटा टायगर

आयसीसीने बुधवारी टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंची रॅंकिंग जाहीर केली. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू चमकले आहेत.

नरेश शेंडे

मुंबई: आयसीसीने बुधवारी टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंची रॅंकिंग जाहीर केली. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू चमकले आहेत. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा बाबर आझमला पिछाडीवर टाकलं आहे. याचा फायदा विराट कोहलीला झाला आहे. तसेच जडेजाच्या जागेवर विश्वचषकाच्या टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये आलेला अक्षर पटेलने आयसीसी रॅंकिंगमध्ये ११ व्या स्थानावर उडी घेतली आहे. तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा विकेटकिपर मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर आहे.

रिझवानने ८६१ गुण मिळवून आयसीसी रॅंकिंगचं अव्वल स्थान गाठलं आहे. तर ८०१ गुण मिळवून सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बाबर आझम पिछाडीवर गेला असून ७९९ गुण असल्याने तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सूर्यकुमार टॉप १० मध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. (ICC T-20 Ranking Latest Update)

कोहलीला झाला फायदा

सूर्यकुमार यादवनंतर रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा १३ व्या स्थानावर आहे. रोहितने ६१३ गुण मिळवले आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली एक रॅंक पुढे गेला आहे. विराट आता १५ व्या नंबरवर पोहोचला आहे. तर केएल राहुल आणि रिषभ पंत ४-४ रॅंक मागे गेले आहेत. राहुल २२ व्या आणि पंत ७० व्या नंबरवर पोहोचला आहे.

अक्षर पटेलची गरूड झेप

गोलंदाजीत असलेल्या टी-२० रॅंकिंगमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार एकमेव भारतीय खेळाडू आहे. भुवनेश्वर रॅंकिंगमध्ये टॉप-१० मध्ये आहे. भुवनेश्वर एक रॅंकचं नुकसान झालं असून तो दहाव्या स्थानावर आहे. तर अक्षर पटेलने ११ रॅंकची मोठी झेप घेतली आहे. तो १८ व्या नंबरवर पोहोचला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळं टीम इंडियातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT