Suryakumar Yadav Saam Tv
Sports

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा भन्नाट देसी अंदाज! सरफराज खानसोबत जमिनीवर बसून मटणावर मारला ताव, Video व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video: सूर्यकुमार यादवचा सरफराज खानसोबत मटणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने २१ चेंडूंत नाबाद ६० धावा केल्या.

Shruti Vilas Kadam

Suryakumar Yadav Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आपल्या फलंदाजीसोबतच एका खास व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. २०२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमारने हैदराबादविरुद्ध पहिल्याच सामन्यात तुफानी फलंदाजी केली. दरम्यान, सामन्यानंतरचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान आणि मुंबई संघातील इतर खेळाडूंसोबत मटणाच्या मेजवानीचा आनंद घेताना दिसत आहे.

सूर्यकुमारचा देसी अंदाज पाहून चाहते खूश

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव जमिनीवर बसून मटणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्याच्यासोबत सरफराज खान आणि मुंबई संघातील काही खेळाडूही उपस्थित आहेत. स्वयंपाकघरात बसून मटण खाताना दिसत आहेत. खेळाडूंचा हा साधा आणि घरगुती अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार एका व्यक्तीची ओळख करून देताना म्हणतो, "हा माणिक भाई आहे. त्याने आमच्यासाठी हे मटण बनवले आहे." यानंतर तो हे वातावरण अगदी घरगुती असल्याचे सांगतो. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा सूर्यकुमार मैदानाबाहेर मात्र मित्रांसोबत निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे.

हैदराबादविरुद्ध सूर्यकुमारची वादळी खेळी

२०२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना हैदराबादविरुद्ध झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या २१ चेंडूंत नाबाद ६० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकार लगावले. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट २८५.७१ इतका होता. सूर्यकुमारच्या या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईला विजय मिळवणे सोपे झाले. त्याला मुशीर खाननेही उत्तम साथ दिली. मुशीरने अवघ्या २४ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांचा मारले.

मुंबईने हैदराबादला ७ गडी राखून हरवले

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा संघ २० षटकांत १७२ धावांवर सर्वबाद झाला. अबिरथ रेड्डीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. मुंबईकडून मॅक्सवेल स्वामीनाथनने गोलंदाजी करत ३ विकेट घेतले. १७३ धावांच्या टार्गेटसाठी मुंबईने अवघ्या १३.१ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला. सूर्यकुमार आणि मुशीर खान यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ २३ चेंडूंत ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अशा प्रकारे मुंबईने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Data Leak : SBI ग्राहकांच्या बँकेचा डेटा लीक; लाखो रेकॉर्ड चोरी, बँकेने उचललं मोठं पाऊल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये विरोधकांसह सत्ताधारी उत्तरले रस्त्यावर

Maharashtra Lift Rules 2026: सोसायटीच्या लिफ्टबाबत सरकारचा मोठा निर्णय, नवे नियम लागू; पालन न केल्यास होणार कारवाई

Veg Burger Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा बाजारासारखा कुरकुरीत आणि चविष्ट व्हेज बर्गर, वाचा रेसिपी

Pune : इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच तांत्रिक बिघाड; १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT