suryakumar yadav yandex
Sports

Suryakumar Yadav,IPL 2025: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडणार? या संघाकडून थेट कर्णधारपदाची ऑफर

Suryakumar Yadav, Kolkata Knight Riders Captain: सूर्यकुमार यादव गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्वक करतोय. दरम्यान त्याला थेट कर्णधारपदाची ऑफर मिळाली आहे.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गोलंदाजांनी कितीही प्लान केले तरी त्यांचे प्लान हाणून पाडत हा फलंदाज चौकार षटकारांचा पाऊस पाडतो.

आयपीएल स्पर्धेतही या फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मुंबई इंंडियन्स संघाकडून सुरुवात केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने या फलंदाजाला संधी दिली. तर मुंबई इंडियन्स संघाने ओळख मिळवून दिली. दरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे.

सूर्या सोडणार मुंबईची साथ?

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अशी चर्चा सुरू आहे की, सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने थेट कर्णधारपदासाठी ऑफर दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाबाबत बोलायचं झालं तर या संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळे श्रेयस अय्यरला कर्णधारपदावरून काढण्याची शक्यता खूप कमी आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जातोय की, कोलकाता नाईट रायडर्स संघाने सूर्यकुमार यादवशी संपर्क साधला असून त्याला कर्णधारपदासाठी ऑफर दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सपासून सुरुवात

सूर्यकुमार यादवला खरी ओळख मुंबई इंडियन्स संघाने दिली. मात्र यापूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यावेळी त्याने सुरुवात केली त्यावेळी तो एक सामान्य फलंदाज होता. मात्र आता तो टी -२० क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आहे.

आयपीएलचा नियम बदलणार?

येत्या डिसेंबर महिन्यात आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी मेगा ऑक्शन होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या लिलावात ४ ऐवजी ६ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली जाऊ शकते. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाला जर सूर्यकुमार यादव आपल्या संघात हवा असेल तर खेळाडूंचा ट्रेड करू शकतात. असं झाल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघातील एक खेळाडू मुंबई इंडियन्स संघात येईल. तर सूर्यकुमार यादव कोलकाता नाईट रायडर्स संघात प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT