Suryakumar Yadav Latest News SAAM TV
Sports

Suryakumar Yadav: शतकवीर सूर्यकुमार ठरला 'विक्रमवीर', तुफानी खेळीनंतर 'हे' रेकॉर्ड केले नावावर

सूर्यकुमार यादवने स्फोटक खेळी करून अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

Nandkumar Joshi

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात इंग्लंडचा विजय झाला असला तरी, चर्चा मात्र भारताच्या फलंदाजाचीच सुरू आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं विस्फोटक फलंदाजी करून शतक ठोकलं. या शतकी खेळीबरोबरच टी-20 मध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले. (Suryakumar Yadav Becomes Second Indian Batsman in T20 International Cricket After his ton against England vs India match Update)

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात (India vs England) भारताला 17 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 विकेट गमावून 215 धावा केल्या होत्या. हे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 9 विकेट गमावून 198 धावा केल्या.

भारताकडून सूर्यकुमार यादव याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक केलं. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज (Batsman) ठरला. सूर्यकुमारच्या शतकाच्या जोरावर भारत एकावेळेस विजयाच्या जवळ पोहोचला होता. मात्र, तो बाद झाल्यानंतर भारतीय संघ विजयापासून दूर गेला. तत्पूर्वी भारतानं या मालिकेत आधीच 2 सामने जिंकून विजयी आघाडी घेतली होती.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं शतक केल्यानंतर त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

याआधी के. एल. राहुल याने ही कामगिरी केली आहे. सूर्यकुमारची ही खेळी भारतासाठी टी-20 क्रिकेटमधील ही सर्वोच्च ठरली आहे. (T 20 cricket) त्याच्यापुढे आता केवळ रोहित शर्मा आहे. त्याने 118 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने 55 चेंडूंवर 117 धावांच्या तुफानी खेळीत 14 चौकार आणि सहा षटकार ठोकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT