Sports

SRH vs PBKS IPL 2025: हैदराबादमध्ये अभिषेक शर्माचं वादळ; शतकाच्या तडाख्यात पंजाबच्या धावांचा डोंगर ढासळला

SRH vs PBKS IPL 2025: आयपीएल २०२५ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले. हैदराबाद आणि पंजाब किंग्जमध्ये आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी हैदराबादने १६ सामने जिंकले आहेत.

Bharat Jadhav

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचा संघ भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २४६ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच स्फोटक झाली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या जोडीने पहिल्याच षटकापासून चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू केला.

जीवनदान मिळाल्यानंतर अभिषेक शर्मानं तुफान खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. अभिषेकने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक केलं. त्यानंतर ४० चेंडूत त्याने धमाकेदार शतक केलं. याच शतकाच्या खेळीने पंजाबचा दारूण पराभव झाला. पंजाब किंग्जला १३ व्या षटकात पहिली विकेट मिळाली. ट्रॅव्हिस हेड मोठा फटका मारताना झेलबाद झाला. स्पिनर युजवेंद्र चहलने हेडला झेलबाद केलं. हेडने ३७ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. हेड आणि अभिषेक शर्मा यांनी ७४ चेंडूत १७१ धावांची सलामी भागीदारी केली. हेड बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT