Sunil Gavaskar On Rohit Sharma Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झाल्यानंतर रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. यापूर्वी विराट कोहली तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करायचा.
विराटचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी रोहितच्या नेतृत्वावर जोरदार टिका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
सुनील गावसकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' मला रोहित शर्माकडून खूप आशा होत्या. भारतात कामगिरी करणं वेगळी गोष्ट आहे. मात्र परदेशात जाऊन चांगली कामगिरी करणं हेच तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे दाखवून देतं. त्याने इथे निराशाजनक कामगिरी केली आहे. तो टी -२० क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहे. मात्र तो संघाला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचवू शकला नव्हता. हे खूप निराशाजनक आहे.' आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. (Latest sports updates)
भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की,' त्यांना नक्की प्रश्न विचारायचा आहे की, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी का घेतली? ठीक आहे. नाणेफेक झालं त्यावेळी सांगण्यात आलं होतं की, ढगाळ वातावरण असणार आहे. त्यानंतर प्रश्न असा होता की, तुम्हाला ट्रेविस हेडचे वीक पॉईंट्स माहित नव्हते का?बाउन्सर चेंडूंचा वापर तो ८० धावांवर पोहोचला तेव्हा का केला गेला? ज्यावेळी तो फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी रिकी पॉन्टिंग समालोचन करत असताना, बोलत होता की बाउन्सर चेंडूंचा वापर करा. सर्वांना माहित होतं तरीदेखील असं झालं नाही.' (Sunil Gavaskar on Rohit Sharma)
या पराभवानंतर रोहित शर्माने म्हटलं होतं की, आम्हाला सराव कारण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, 'आम्ही कुठल्या तयारी बद्दल बोलतोय? तुम्ही १५ दिवसांपूर्वी जाऊन सराव सामने खेळा. संघातील प्रमुख खेळाडू विश्रांती करू शकतात. मात्र रिझर्व्ह खेळाडू सराव करू शकतात.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.