kl rahul  instagram
Sports

KL Rahul Birthday: जावयाच्या वाढदिवशी सासरेबुवांची खास पोस्ट! स्पेशल कॅप्शन देत दिल्या हटके शुभेच्छा

Suniel Shetty Instagram Post: केएल राहुल आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करतोय.

Ankush Dhavre

Suniel Shetty Birthday Wish: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करतोय.

या खास दिवशी केएल राहुलच्य फॅन्सने सोशल मीडियाद्वारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना सासरे सुनिल शेट्टी यांनी देखील खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि केएल राहुलचे सासरे Suniel Shetty हे सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. आता जावयाच्या वाढदिवसाच्या दिवशी सुनील शेट्टी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

या फोटोमध्ये सुनील शेट्टी केएल राहुलला माथ्याला टिळा लावताना दिसून येत आहेत. हा फोटो केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या विवाह सोहळ्यातील असल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये केएल राहुलने शेरवानी परिधान केली आहे. (KL Rahul Birthday)

खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा...

ही खास पोस्ट शेअर करत सुनील शेट्टी यांनी KL Rahul ला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, 'तू आमच्या आयुष्यात असल्याचा आम्हाला आनंद आहे. लव्ह यु बाबा...' यापुढे त्याने लाल रंगाचा हार्ट देखील दिला आहे. (Latest sports updates)

या पोस्टच्या खाली चाहत्यांनी देखील कमेंट करत केएल राहुलला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुनील शेट्टी यांनी शुभेच्छा देताच केएल राहुलने देखील हार्टचा इमोजी कमेंट करत त्यांचे आभार मानले आहेत.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी अडकले होते विवाह बंधनात..

केए राहुल आणि सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हे दोघेही याच वर्षी विवाह बंधनात अडकले होते. दोघेही २३ जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले होते. दोघांनी डेस्टीनेशन वेडिंग केली होती. हा विवाह सोहळा खंडाळाच्या फार्म हाऊसवर पार पडला होता. या विवाह सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनाळ्यात चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT