Steve smith
Steve smith  Saam Tv
क्रीडा | IPL

IND VS AUS 3rd test: 'हा माझा नाही तर पॅट कमिन्सचा संघ आहे..' सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथ असं का म्हणाला ?

Ankush Dhavre

IND VS AUS 3rd Test Steve Smith Statement: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाचा हा या मालिकेतील पहिला विजय आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने २-१ ने कमबॅक केले आहे. दरम्यान हा सामना झाल्यानंतर जेव्हा स्टीव्ह स्मिथला नेतृत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने मन जिंकणारे उत्तर दिले आहे. (Latest sports updates)

या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाने दिल्ली आणि नागपूर कसोटीत जोरदार कामगिरी करत २-० ची विजयी आघाडी घेतली होती. असे वाटत होते की , भारतीय संघ तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करणार. मात्र स्टीव्ह स्मिथने भारतीय संघाचे स्वप्नाचे भंग केले.

दिल्ली कसोटी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू माघारी परतले होते. ज्यात कर्णधार पॅट कमिन्सचाही समावेश होता. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने ऑस्ट्रेलियाला जोरदार कमबॅक करून दिले.

हा सामना झाल्यानंतर त्याला नेतृत्वाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने म्हटले की ,'हा पॅट कमिन्सचा संघ आहे..' त्याने या विजयाचे श्रेय ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना दिले आहे. त्याच्या या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे की, पॅट कमिन्स परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये.

ऑस्ट्रेलियाने मिळवला ९ गडी राखून विजय

हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला केवळ ७६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने ४९ धावांची खेळी केली. तर लाबुशेनने २८ धावांचे योगदान दिले. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis Meet Ganesh Naik : ठाण्यातलं नाराजीनाट्य फडणवीसांच्या भेटीने संपणार? गणेश नाईक-फडणवीस भेट होणार

PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? मग आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा, झिरो फिगर मिळेल

SCROLL FOR NEXT