Usman Khawaja Saam TV
Sports

'मी मुस्लीम आहे मला...!' ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचं पाकिस्तानात धर्मावरुन विधान

मात्र, जन्मभूमीवर त्याचे शतक तीन धावांनी हुकले.

वृत्तसंस्था

रावळपिंडी येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pak Vs AUS) यांच्यातील पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजाचे (Usman Khawaja) शतक हुकले. तो 97 धावांवर बाद झाला. शतक हुकले आणि त्याने धर्माचा अँगलमध्ये आणला. उस्मान ख्वाजा पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की, तो मुस्लिम असून तो अल्लाहवर विश्वास ठेवतो. जे काही चांगले आणि वाईट आहे ते समानतेने स्वीकारावे लागते. उस्मान ख्वाजाला खेळीदरम्यान अनेक जीवनदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा करुन घेतला. मात्र, जन्मभूमीवर त्याचे शतक तीन धावांनी हुकले. उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानातच झाला होता. नंतर त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियाला गेले.

उस्मान ख्वाजा म्हणाला, ''मी मुस्लिम असून अल्लाहवर विश्वास ठेवतो. जे घडते ते चांगले असो वा वाईट ते स्वीकारावे लागते. माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. मग आयुष्यात काही गोष्टी ठराविक पद्धतीने घडायला हव्यात पण तसं होत नाही. मला वाटते आपण ते मान्य करावे. 97 बाद होणे सहाजीक आहे. कसोटीतील ही माझी तिसरी वेळ आहे जेव्हा मी 97 धावांवर बाद झालो आहे. यापूर्वी मी मेलबर्नमध्ये 97 धावांवर बाद झालो. पण चांगल्या गोष्टींसोबतच मी वाईट गोष्टीही स्वीकारतो. जे व्हायचे ते होईल. कधी 97 तर कधी द्विशतके होईळ. त्यामुळे हे सर्व चालू आहे.''

वॉर्नरसोबत ख्वाजाची चांगली फलंदाजी

पाकिस्तानात जन्मलेला ख्वाजाने (15 चौकार) डेव्हिड वॉर्नरसोबत पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोन डावखुऱ्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांची कोणतीही अडचण झाली नाही, त्यामुळे या दोघांनी पहिल्या सत्रात 23 चौकार लगावले. तिसर्‍या दिवशी उपाहारानंतरच्या सत्रात साजिद खानने वॉर्नरच्या रुपात ​​ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला आणि पहिल्या विकेटसाठीची शतकी भागीदारीही संपुष्टात आणली. वॉर्नरने 68 धावा केल्या, त्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज नौमान अलीने ख्वाजाला आपला शिकार बनवले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT