Novak Djokovic Us Open Semi Final twitter
Sports

Novak Djokovic: जोकोविचची US Open च्या सेमीफायनलमध्ये धडक! मोडला रॉजर फेडररचा 'हा' मोठा रेकॉर्ड

Novak Djokovic Us Open Semi Final: जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

Taylor Fritz vs Novak Djokovic:

अमेरिकन ओपन स्पर्धेतही सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचचा जलवा पाहायला मिळाला आहे. अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जवर एकतर्फी विजय मिळवला आहे. यासह जोकोविचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

मंगळवारी रात्री आर्थर ऐश स्टेडियममध्ये पार पडला. टेलर फ्रिट्जचा सामना करताना जोकोविचने दमदार खेळ केला. त्याने या सामन्यात ६-१,६-४, ६-४ ने विजय मिळवला. या विजयासह आता टेलर फ्रिट्जविरूद्ध खेळताना जोकोविचचा रेकॉर्ड ८-० वर जाऊन पोहोचला आहे.

या विजयासह जोकोविचने रॉजर फेडररचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रॉजर फेडररने ४६ वेळेस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता जोकोविचने त्याला मागे सोडत ४७ वेळेस ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा कारनामा केला आहे. जोकोविचचा सेमीफायनलचा सामना बेन शेल्टनसोबत होऊ शकतो. (Latest sports updates)

नोवाक जोकोविचने गेल्या २४ सामन्यांपैकी २३ सामने जिंकले आहेत. त्याच्याडे आणखी एक खास रेकॉर्ड आफल्या नावे करण्याची संधी असणार आहे.त्याच्याकडे आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा एकाच वर्षी ४ प्रमुख स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. तर तो चौथ्यांदा एकाच वर्षी ४ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT