star indian cricketer suryakumar yadav and tilak verma visited lalbaug cha raja on the occasion of ganesh chaturthi ahead of world cup 2023  Saam tv
Sports

Lalbaug Cha Raja: टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंची लालबागच्या दरबारात हजेरी; वर्ल्डकप जिंकण्यासाठी घातलं साकडं

Suryakumar Yadav At Lalbaug Cha Raja: वर्ल्डकपपूर्वी स्टार भारतीय खेळाडूंनी लालबागच्या चरणी हजेरी लावली आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav And Tilak Verma At Lalbaug Cha Raja:

सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामांन्याप्रमाणे सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील गणपतीच्या बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत.नुकताच भारतीय संघाचा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने लालबागच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने लालबागच्या बाप्पासमोर माथा टेकला आहे. मध्यरात्री १२:३० च्या दरम्यान या दोघांनी हजेरी लावली होती. दोघेही दाखल होताच आजूबाजूच्या लोकांनी या स्टोर खेळाडूंसोबत फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरूवात केली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सूर्यकुमार यादवसोबत त्याची पत्नी देविशा शेट्टी देखील असल्याचं दिसून येत आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकपसाठी केली प्रार्थना..

आगामी वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात होणार असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. या संघात सूर्यकुमार यादवला देखील स्थान दिलं गेलं आहे. लालबागच्या चरणी सूर्यकुमार यादवने वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रार्थना केली आहे.

तर दुसरीकडे तिलक वर्मा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे.चीनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ दमदार खेळ करून सूवर्णपदक जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या संघाचे कर्णधारपद रूतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT