sheldon jackson saam tv
Sports

Cricketer Retirement: सिडनी कसोटी सुरु असतानाच स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Sheldon Jackson Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरु असताना स्टार भारतीय खेळाडूने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत आणण्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

दरम्यान हा सामना सुरु असतानाच स्टार भारतीय खेळाडूने लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शेल्डन जॅक्सनने लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटला रामराम केला आहे. शेल्डन जॅक्सनच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने लिस्ट ए क्रिकेटमधील ८६ सामन्यांमध्ये ९ शतक आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने २७९२ धावा केल्या आहेत.

नाबाद १५० धावा ही त्याच्या लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. शेल्डन जॅक्सन हा आपल्या विकेटकिपिंगसाठी ओळखला जातो. त्याने विकेटकिपिंग करताना ४२ झेल घेतले आहेत. यासह ९ स्टम्पिंग केले आहेत.

शेल्डन जॅक्सनच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ८४ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १ शतक आणि ११ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये १८१२ धावा करण्याची नोंद आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना नाबाद १०६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

शेल्डन जॅक्सनने लिमिटेड ओव्हर्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र तो रणजी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो सौराष्ट्रकडून मैदानात उतरणार आहे. शेल्डन जॅक्सन यापूर्वी आयपीएल स्पर्धेतही खेळताना दिसून आला आहे. त्याने या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

त्याला या स्पर्धेत ९ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ६१ धावा केल्या आहेत. तो सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीसारख्या स्पर्धा खेळताना दिसून येणार नाहीये. तो पंजाबविरुद्ध शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. या सामन्यात त्याने १० चेंडूत १३ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT