Arjun Tendulkar Saam TV
क्रीडा

Arjun Tendulkar: अर्जुनची धडाकेबाज खेळी, पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यात ठोकलं शतक

प्रविण वाकचौरे

Ranji Trophy 2022: अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने शानदार शतक साजरं केलं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचा सामना राजस्थानशी सुरु आहे.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला कडवं आव्हान दिलं आहे. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. अर्जुनने आपल्या डावात एकूण 26 सिंगल, 7 डबल धावा केल्या. सुमारे 56 च्या स्ट्राइक रेटने त्याने या धावा केल्या.  (Latest Marathi News)

सचिनबद्दल बोलायचे तर त्याने डिसेंबर 1988 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून खेळताना सचिनने गुजरातविरुद्ध शतक झळकावले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला आणि रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याने 129 चेंडूत शतक झळकावले. त्याने 12 चौकार मारले होते. 100 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला होता. (Sports News)

अर्जुन तेंडुलकर त्याच्या प्रथम श्रेणी पदार्पणापूर्वी आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र आतापर्यंत तो T20 लीगमध्ये एकही सामना खेळला नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

अर्जुनला मुंबई इंडियन्सने पहिल्या सत्रात 20 लाख रुपयांना करारबद्ध केले होते, त्यानंतर पुढच्या सत्रात 30 लाख रुपयांना. आता अर्जुन तेंडुलकरने रणजीमध्ये शतक झळकावल्याने त्याची आयपीएलमधील पदार्पणाची प्रतीक्षाही संपेल अशी अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT