IND vs SA Saam TV
Sports

IND vs SA: भारत दौऱ्यासाठी आफ्रिकेचा संघ जाहीर; घातक गोलंदाज संघात परतला

'बेबी एबी डिव्हिलियर्स' या नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Pravin

आयपीएलचा 15वा सीझन संपल्यानंतर काही दिवसातच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार (South Africa tour of India) आहे. टी-20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे.

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा (South Africa Squad) करण्यात आली आहे. झंझावाती गोलंदाज एनरिक नॉर्टजे संघात परतला आहे. दुखापतीमुळे तो काही काळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाहेर होता. त्याचबरोबर युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सचाही संघात समावेश करण्यात आला आहे. स्टब्सने आयपीएलच्या या मोसमातही पदार्पण केले आहे. तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे. 'बेबी एबी डिव्हिलियर्स' या नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे 21 वर्षीय उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज स्टब्सने क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) T20 चॅलेंजमध्ये गॅबेट्स वॉरियर्सकडून खेळताना गेल्या हंगामात प्रभावित केले. त्याने सात डावात 48.83 च्या सरासरीने 293 धावा केल्या. यामध्ये 23 षटकारांचा समावेश होता. या दरम्यान स्टब्सचा स्ट्राइक रेट 183.12 होता. आयपीएलला येण्यासाठी तो झिम्बाब्वेमधील दक्षिण आफ्रिका 'अ' संघाचाही एक भाग होता.

दक्षिण आफ्रिका संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शम्सी, रुब्सन ट्रिस्टन, रुब्सी मार्को यानसेन.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

SCROLL FOR NEXT