IND vs SA: सामन्यापुर्वी माशी शिंकली; मोठी अपडेट आली समोर Saam TV
Sports

IND vs SA: सामन्यापुर्वी माशी शिंकली; मोठी अपडेट आली समोर

प्रेक्षक आल्यावर बायो बबलमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या मालिकेत प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पोहोचला आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) धोक्यामुळे प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. प्रेक्षक आल्यावर बायो बबलमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या मालिकेत प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण आफ्रिकन (Sauth Africa Govenment) सरकारने COVID-19 च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रोटोकॉल लागू केले आहेत. या कारणास्तव सुपरस्पोर्ट पार्कने तिकीटांची विक्री केलेली नाही. सरकारने लागू केलेल्या सध्याच्या COVID-19 निर्बंधांनुसार, 2,000 चाहते स्टेडियममध्ये येऊ शकतात. अशा परिस्थितीत काही निवडक लोकच हा सामना पाहू शकतील. कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास बंदी घातली जाऊ शकते अशा बातम्या या अगोदर आल्या होत्या. आता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबत औपचारिक माहिती दिली आहे.

याआधी वाँडरर्स स्टेडियमच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्याचे कोणतेही तिकीट विकले गेलेले नाही. प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल की नाही हे स्पष्ट नाही. भविष्यात आम्ही या संबंधीत घोषणा करु. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी बायो बबलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी विराट कोहली आणि संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवण्यात आले होते आणि ते आतापर्यंत व्हायरसच्या धोक्यापासून सुरक्षित आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT