SAvsWI: दक्षिण आप्रिकेने अंतिम सामना जिंकत मालिका घातली खिशात Twitter/ @ICC
Sports

SAvsWI: दक्षिण आप्रिकेने अंतिम सामना जिंकत मालिका घातली खिशात

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 169 धावांचे लक्ष्य ठेवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि अॅडन मार्कराम यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्ध पाचव्या टी -20 मध्ये 25 धावांनी विजय मिळविला. 2019 नंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच टी-20 मालिका जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 169 धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्यात आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला खातेही उघडता आले नाही. पण त्यानंतर डी कॉक आणि मार्कराम यांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले.

क्विंटन डी कॉकने 42 चेंडूत 60 धावा केल्या. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अॅडन मार्करामने 48 चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून इव्हिन लुईसने 34 चेंडूत 52 धावा फटकावल्या. त्याच वेळी शिमरॉन हेटमीयरनेही 33 धावांचे योगदान दिले, परंतू दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यासाठी हा स्कोअर पुरेसा नव्हता. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिका ३-२ ने जिंकली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT