sharad pawar & deepali sayeed News, Maharashtra Kesari latest Marathi news, Maharashtra Kesari News
sharad pawar & deepali sayeed News, Maharashtra Kesari latest Marathi news, Maharashtra Kesari News saam tv
क्रीडा | IPL

Maharashtra Kesari: 'त्या' विषयी शरद पवारांकडे पाठपूरावा सुरु : दिपाली सय्यद

दिलीप कांबळे

मावळ : महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) कुस्ती (wrestling) स्पर्धा ज्याप्रमाणे पुरुषांची होते त्याचप्रमाणे महिलांची (women maharashtra kesari) देखील झाली पाहिजे. त्यासाठीचा पाठपुरावा मी करत असून लवकरच महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होईल असा विश्वास शिवसेनेच्या (shivsena) दीपाली सय्यद (deepali sayed) यांनी व्यक्त केला. (Maharashtra Kesari latest Marathi news)

दिपाली सय्यद म्हणाल्या महाराष्ट्रात महिलांना देखील कुस्ती खेळण्याची संधी मिळावी अशी महिला मल्लांची भावना आहे. महाराष्ट्रत (maharashtra) आतापर्यंत ७०० महिला मल्ल या तयार असून भविष्यात एक चांगले व्यासपीठ मिळाले अनेक महिला मल्ल देखील महाराष्ट्र केसरीसाठी तयार होतील. याबाबतचा पाठपुरावा कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याकडे सुरु असून त्यांनी देखील यासाठी होकार दिल्याचे दीपाली सय्यद यांनी नमूद केलं.

संस्कार विसरून गेले

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या बसून बोलून हक्काने मागून घ्यायला पाहिजे. त्यासाठी एखादया जेष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणं हे योग्य नसल्याचे मत सय्यद यांनी व्यक्त केले आहे. एसटी आंदोलन हे भरकटले असून त्याला राजकारणाचे स्वरूप दिले जात आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी वर्षोनुवर्षे राजकारण केलेल्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर हल्ला करणे योग्य नाहीच. या राजकारण करण्याच्या नादात काही जण संस्कार विसरून गेले आहेत.

ते धुतल्या तांदळातले नाहीत

विरोधी पक्षनेत्यांनी ईडी हे एक शस्त्र बनवले आहे. काही झालं की फक्त ईडीचा बाण सोडत आहेत. त्यांना अस वाटतंय की (ED) चौकशी बसवली की महाविकास आघाडीच्या (mva) नेत्यांना संपवुन टाकू शकतो आणि मी परत जाऊन त्या खुर्चीवर बसू शकतो. त्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. परंतु हे सगळ्यांना समजतंय आणि दिसतय. ते देखील धुतल्या तांदळातले नाहीत अशी टीका शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी महाविकास आघाडीवर सतत सुरू असलेल्या ED च्या धाडीवंर नाराजी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT