Shikhar Dhawan  x
Sports

Shikhar Dhawan Girlfriend : सर्वात सुंदर मुलगी माझी गर्लफ्रेंड... शिखर धवनचा डेटिंगच्या चर्चांवर मोठा खुलासा, Video होतोय व्हायरल

Shikhar Dhawan Girlfriend Video : सोशल मीडियावर शिखर धवनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिखर त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलत आहे. व्हिडीओच्या शेवटी त्याची कथित गर्लफ्रेंड दिसते.

Yash Shirke

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये आयशा मुखर्जी आणि शिखर धवन यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर शिखरच्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे शिखर धवनच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावर शिखर धवनला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सुरुवातीला त्याने प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. पण त्यानंतर शिखरने त्याच्या शैलीत विचारलेल्या प्रश्नांची गमतीशीर उत्तरे दिली. मी कोणाचं नाव घेणार नाही... पण या खोलीतील सर्वात सुंदर मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे असे वक्तव्य शिखर धवनने केले. त्यानंतर कॅमेरा एका सुंदर रशियन मुलीकडे वळल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान शिखर धवनच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळत होते. शिखरसोबत दिसणारी तरुणी कोण या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांनी शोधून काढले. शिखर धवनच्या कथित गर्लफ्रेंडचे नाव सोफी शाइन असल्याचे समोर आले होते. तेव्हाचा एक व्हिडीओ आताही व्हायरल होत आहे.

शिखर धवनने डेंटिंगच्या चर्चांवर अजूनतरी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाहीये. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्याने गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान शिखर धवनचे अनेक चाहते त्याच्यासाठी खुश आहेत. वैवाहिक जीवनामध्ये त्रास सहन केल्यानंतर तो कमबॅक करत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT