sarfaraz khan  twitter
Sports

Sarfaraz Khan Run out: जडेजाच्या या चुकीमुळे सरफराजचं शतक हुकलं! ड्रेसिंग रुममध्ये असलेला रोहित भडकला; Video

Sarfaraz Khan Run Out Ravindra Jadeja: सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी केली. मात्र खातं उघडल्यानंतर त्याने गियर टाकत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अवघ्या चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Ankush Dhavre

IND vs ENG 3rd Test, Sarfaraz Khan Run Out:

मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खानला अखेर भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी केली. मात्र खातं उघडल्यानंतर त्याने गियर टाकत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अवघ्या चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

जडेजाची ती चूक अन् सरफराज खान बाद..

एकदा सेट झाल्यानंतर सरफराज खान चौफेर फटकेबाजी करु लागला. त्याने स्वीप आणि स्टेप आऊट होऊन इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याची शतकी खेळीची वाटचाल सुरु होती. त्याची फलंदाजी पाहून असं वाटत होतं की,तो पदार्पणात आपलं शतक पूर्ण करेल. मात्र ६२ धावांवर फलंदाजी करत असताना जडेजाच्या चुकीमुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना ८२ वे षटक टाकण्यासाठी जेम्स अँडरसन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी जडेजा ९९ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने लेग साईडच्या दिशेने शॉट मारला आणि सरफराजला धावण्याचा इशारा केला.

सरफराजने धाव घेतली, मात्र तो पुढे येताच जडेजाने त्याला मागे जाण्यासाठी सांगितलं. इतक्यात मार्क वुडने डायरेक्ट हीट मारत त्याला धावबाद करत माघारी धाडलं. त्यावेळी तो चांगला सेट झाला होता. ६२ धावांवर फलंदाजी करत असलेल्या सरफराजकडे पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र जडेजामुळे ही संधी हुकली आहे.

जडेजाच्या या चुकीवर कर्णधार रोहित शर्मा देखील संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. ड्रेसिंग रुममध्ये असलेसा रोहित शर्मा रागात आपली कॅप खाली फेकताना दिसून आला. स्वत: सरफराज खानही नाराज असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान रविंद्र जडेजाने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र तो शतकी खेळीचं सेलिब्रेशन करताना दिसून आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT