sanju samson completed 200 sixes in ipl breaks the record of ms dhoni virat kohli and rohit sharma amd2000 twitter
Sports

Sanju Samson Record: संजू सॅमसनचा मोठा कारनामा! या रेकॉर्डमध्ये रोहित, धोनी अन् विराटलाही सोडलं मागे

Sanju Samson Sixes Record: संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ८४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने शानदार कामगिरी केली आहे. या संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मंगळवारी( ७ मे) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. २२२ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने ८४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवण्यासाठी २२२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने ४ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संजू सॅमसनने जोस बटलरसोबत मिळून संघाचा गाडा पुढे नेला. त्यानंतर जोस बटलर १९ धावा करत माघारी परतला.

पण संजू सॅमसन काही थांबला नाही. त्याने ४६ चेंडूंचा सामना करत ८६ धावा ठोकल्या. त्याने राजस्थान रॉयल्स संघाला विजयाच्या अगदी जवळ नेलं होतं. मात्र ८६ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने आपल्या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ६ षटकार मारले. यासह त्याने एमएस धोनी,विराट कोहली आणि रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या खेळीदरम्यान संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेत २०० षटकार मारण्याचा कारनामा केला आहे. असा कारनामा करणारा तो १० वा फलंदाज ठरला आहे. त्याने २०० वा षटकार १५९ व्या इनिंगमध्ये आणि ३०८१ चेंडूंमध्ये मारला आहे. धोनीने हा कारनामा १६५ इनिंगमध्ये आणि ३१२६ चेंडूंमध्ये केला होता. तर रोहितने हा कारनामा १८५ व्या इनिंगमध्ये ३७९८ चेंडू खेळून केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT